News Flash

अनैतिक संबंधास विरोध; प्रेयसीच्या मदतीने केली पत्नीची हत्या

लोणी पोलिसांनी मयतचा पती व प्रेयसी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अनैतिक संबंधास विरोध केल्याने पतीने त्याच्या प्रेयसीच्या मदतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे घडली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी मयतचा पती व प्रेयसी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

लोणी खुर्द येथे विश्वास रंगनाथ गायकवाड हा त्याची पत्नी कल्पनासह (वय ४०) राहतो. विश्वासचे एका मुलीशी अनैतिक संबंध होते. ही बाब कल्पनाला समजली होती. तिने पतीच्या संबंधांना विरोध दर्शवला. तसेच त्याची समजूत काढण्याचा प्रय़त्नही केला. पण विश्वासला पत्नीचा काटा काढायचा होता.  अखेरीस घरात कोणीही नसताना विश्वासने कल्पनाची गळा दाबून खून केला. शवविच्छेदनात ही बाब उघड झाल्यानंतर लोणी पोलिसांनी विश्वास रंगनाथ गायकवाड व प्रेयसी प्रमिला ऊर्फ शहाबाई या दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विश्वासला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 1:26 pm

Web Title: ahmednagar man kills wife who opposed illicit relationship
Next Stories
1 साताऱ्यात भीषण अपघात; जीप दरीत कोसळून चार ठार
2 मोदींना अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका देणार का?, राज ठाकरे म्हणतात…
3 मोदींवरील रागामुळेच तीन राज्यात भाजपाचा पराभव: राज ठाकरे
Just Now!
X