News Flash

जिल्ह्यात लशींचा खडखडाट

दोन दिवसानंतर साठा उपलब्ध होण्याची शक्यता

दोन दिवसानंतर साठा उपलब्ध होण्याची शक्यता

नगर:जिल्ह्यातील करोना प्रतिबंधक लशींचा साठा संपल्याने पुढील दोन दिवसात लसीकरण होण्याची शक्यता कमी आहे. जिल्ह्यात केवळ नगरच्या महापालिकेकडे ४०० कोविशिल्ड लसींचा साठा शिल्लक राहिलेला आहे. अर्थात लशींचा खडखड होण्याची ही काही जिल्ह्यातील पहिली वेळ नाही. यापूर्वीही साठा संपण्याचे प्रसंग उद्भवले. मात्र शिल्लक साठय़ातून दुसऱ्या दिवशी काही प्रमाणात लसीकरण सुरू राहिले. मात्र लसीकरण पूर्णत: बंद पडण्याचा बाका प्रसंग पहिल्यांदाच उद्भवल्याचे समजले.

जिल्ह्यात काल, मंगळवापर्यंत एकूण ४ लाख ४४ हजार २६ जणांचे लसीकरण झाले आहे.

आज किती जणांचे लसीकरण झाले याची माहिती  सायंकाळपर्यंत आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाली नाही. जिल्ह्यातील लशींचा साठा पूर्णत: संपल्याच्या माहितीला जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली तर महापालिकेकडे केवळ ४०० लशींचा साठा शिल्लक असल्याचे मनपा आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले. दोन दिवसानंतर लशींचा साठा उपलब्ध होण्याची शक्यता डॉ. सांगळे यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात लसीकरणाची १६३ केंद्रे आहेत. त्यात नगर शहरात महापालिकेची ८ व खाजगी १०, ग्रामीण भागात २५ ग्रामिण रुग्णालये व जिल्हा परिषदेचे ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, नगर शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील काही खासगी रुग्णालये अशा एकूण १६३ केंद्रांवर लसीकरण केले जाते.

जिल्हा सरकारी रुग्णालयाला सर्वाधिक म्हणजे रोज किमान ५०० ते ७०० डोस उपलब्ध करून दिले जातात, तर मनपा, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी १०० से १५० डोस उपलब्ध करून दिले जातात. मात्र उपलब्ध डोसच्या तुलनेत अधिक संख्येने नागरिक लसीकरणासाठी केंद्रावर भर उन्हात रांगा लावतात. प्राथमिक आरोग्य केंद्रावर केवळ कोविशिल्ड लस दिली जाते तर इतर ठिकाणच्या सर्व केंद्रांवर कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड अशा दोन्ही प्रकारच्या लसी दिल्या जातात.

राज्य सरकारने नगर जिल्ह्यात तातडीने लस उपलब्ध करून द्यावी, सध्या करोना संसर्गाची परिस्थिती भयावह असताना लशीचा तुटवडा होणे गंभीर आहे, अशी मागणी भाजपचे माजी शहर सरचिटणीस मुकुल गंधे यांनी केली. नागरिकांनीही विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणाला जाण्यापूर्वी केंद्रांवर लस उपलब्ध आहे की नाही, याची खात्री करावी असे आवाहन गंधे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2021 1:52 am

Web Title: ahmednagar municipal corporation has a stock of 400 covishield vaccine zws 70
Next Stories
1 उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा वकिलांचा करोनाने मृत्यू
2 लातूर जिल्ह्यात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
3 बीड जिल्ह्यात रेमडेसिविरचा काळाबाजार
Just Now!
X