News Flash

RBI ची परीक्षा देण्यासाठी औरंगाबादला गेलेल्या नगरच्या तरुणाची निर्घृण हत्या

डाव्या हाताविना आढळला मृतदेह

अहमदनगरच्या एका तरुणाची औरंगाबादमध्ये निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे त्याचा मृतदेह एक हात नसलेल्या अवस्थेत आढळला. आज (दि.९) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची लिपीक पदाची परिक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह औरंगाबाद शहरातील कब्रस्तानात आढळला. विकास देवीचंद चव्हाण (२३, रा. पाथर्डी, नगर) असं मृत तरुणाचं नाव असून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. विकास हा भारतीय रिझर्व्ह बॅंकेची लिपीक पदाची परीक्षा देण्यासाठी नगरच्या पाथर्डीहून औरंगाबादला गेला होता. पण, आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कब्रस्तानात त्याचा मृतदेह आढळला. मारेकऱ्यांनी विकासचा एक हात कोपरापासून तोडला होता. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनास्थळावरुन मृतदेहाचा तोडलेला हातही पोलिसांना सापडला असून पोलिस घटनेचा सखोल तपास करत आहेत. तर, मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत विकास पाथर्डीजवळील हरि तांडा येथील रहिवासी होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 3:23 pm

Web Title: ahmednagar youth brutally murdered in aurangabad sas 89
Next Stories
1 लॉकडाउनसंबंधी राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…
2 राज्य सरकारचा मोठा निर्णय! ११ एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली!
3 सत्तेतील मराठी मंत्री दिल्लीत बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत – संजय राऊत
Just Now!
X