News Flash

तारापूरमध्ये घुसमट कायम

वायुप्रदूषण सुरूच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

वायुप्रदूषण सुरूच; प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जलप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जात असताना वायुप्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे भय उरलेले नाही. काही बडय़ा उद्योजकांच्या कारखान्यातील वायुप्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या विकारांचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील वायुप्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

तारापूर औद्य्ोगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या विषारी वायूमुळे औद्योगिक क्षेत्रात आणि परिसरातील गावांमध्ये वायुप्रदूषणाचा स्तर वाढला आहे. विराज प्रोफाईल्स लिमिटेड या पोलाद (स्ट्रील) उद्योग कारखान्यातून रोज मोठय़ा प्रमाणात लालसर असलेला धूर निघतो. स्क्रॅप लोखंडावर भट्टीमध्ये प्रक्रिया करताना हा निघणारा रासायनिक व धुळीकण असलेला वायू संपूर्ण परिसरात पसरतो. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असताना देखील त्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असलयाचे दिसून येते. रात्रीच्या वेळी धूलिकण परिसरात पसरत असल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रासदायक ठरत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कार्यालयावर असलेले प्रदूषण मापक यंत्र अनेक वर्षांपासून बंद असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झालेले आहे. औद्योगिक क्षेत्रातील काही रासायनिक कारखान्यांमध्ये रात्रीच्या वेळी उत्पादने घेतली जातात. याचवेळी घातक अशा प्रक्रिया केल्या जात असल्याने त्यातून निघणारे विषारी वायू रात्रीच्या वेळी हवेमध्ये सोडले जातात. रासायनिक कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे वायुप्रदूषण होऊ  नये यासाठी स्क्रबर सिस्टमचा वापर करणे आवश्यक असते. परंतु ही प्रक्रिया खर्चीक असल्याने कारखान्यांकडून तिचा वापर केला जात नसल्याचे दिसून येते.

नियमनासाठी पथकांचा अभाव

ल्ल तारापूर औद्योगिक परिसरातील बोईसर, सरावली, कोलवडे, कुंभवली, पाम, पास्थळ आणि सालवड या गावांतील रहिवाशांना रात्रीच्या वेळी होणाऱ्या वायुप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. नियमांचे उल्लंघन करून रासायनिक वायू उत्सर्जित करणाऱ्या  कारखान्यांवर कारवाई केली जात नाही.

ल्ल तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांकडून रात्रीच्या वेळी सेडल्या जाणाऱ्या वायुप्रदूषणावर आळा बसावा यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात येणार होते. परंतु वर्ष उलटून गेले तरीही कोणत्याही प्रकारचे पथक या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:54 am

Web Title: air pollution continues in tarapur industrial sector zws 70
Next Stories
1 रोप लागवडीत पालघर जिल्हा राज्यात आघाडीवर
2 वाढवण बंदराला ग्रामस्थांचा विरोधच
3 मत्स्यबीज न मिळाल्याने शेतकरी अडचणीत
Just Now!
X