News Flash

आधी घड्याळाचे बटण दाबा, पैसे मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला अजित पवारांचं उत्तर

'घड्याळाचे बटण दाबायचे नाही आणि आम्हाला पैसे का मिळाले नाही म्हणून आम्हाला विचारता'

पैसे मिळत नाही अशी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला आधी घड्याळाचे बटण दाबा असं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी दिलं. पाथर्डी येथील जाहीर सभेत बोलताना एका शेतकऱ्याने पैसे मिळत नसल्याची तक्रार अजित पवारांकडे केली. यावर अजित पवारांनी त्यांना सांगितलं की, आधी घड्याळाचे बटण दाबा. घड्याळाचे बटण दाबायचे नाही आणि आम्हाला पैसे का मिळाले नाही म्हणून आम्हाला विचारता. अहो त्या कमळाबाईला विचारा ना.

पुढे बोलताना त्यांनी जलयुक्त शिवारच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली. जलयुक्त शिवाराने हजारो गावे टँकरमुक्त झाली आहे असं सांगत आहेत. कुठे झाली आहेत दाखवा. आज पाथर्डी, शेवगावमध्ये १२३ गावात टँकरने पाणी का दिले जात आहे उत्तर द्या. या जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफी कशी झाली पाहिजे… तर दोन महिन्यात कर्जातून शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे परंतु आज तसे होत नाही. नुसती पोकळ आश्वासनं, गाजरं दाखवून उपयोग नाही त्यासाठी काम केलं पाहिजे असा टोला अजित पवार यांनी लगावला.

चारा छावण्यांबाबत सरकारने काढलेला जीआरचा समाचार दादांनी आपल्या भाषणात घेतला एखाद्या शेतकर्‍याकडे पाच सहा गुरे आहेत मग पाचच्या वर गुरे असतील तर शेतकऱ्यांनी बाकीची गुरं कुठे न्यायची. म्हणजे यांचे मंत्री राम शिंदे यांनी सांगितले तसे पाहुण्यांकडे गुरे नेवून बांधायची असेच सरकार करायला लावत आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर का उठला आहात. तो सर्वांना जगवतोय. मंत्र्यांचे कारखाने आहेत त्यांनी एफआरपी दिली का. हे कुठल्या तोंडानी सांगणार आहात असा सवाल अजित पवारांनी विचारला.

या सरकारची थापेबाजी सुरु आहे. चुकीचे आदेश काढत आहेत हे वेळीच ओळखा. कसल्या लाल पिवळ्या याद्या काढता. हा सिग्नल आहे का लाल, पिवळा, हिरवा दिसला की थांबा आणि जावा हे काय चाललं आहे असा संतप्त सवालही अजितदादा पवार यांनी विचारला.

बजेटमध्ये जाहीर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. अहो १६ रुपये महिन्याला सरकार देणार आहे. का चेष्टा करत आहात. अगोदर लहान लहान गाजरं दाखवत होते आणि आज मोठा गाजर दाखवला आहे अशी टीका अजित पवार यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2019 11:15 pm

Web Title: ajit pawar ask farmer to vote ncp complaining not getting money
Next Stories
1 बाईला नाचवा आणि गाईला वाचवा असे हे भाजप सरकार – छगन भुजबळ
2 Budget 2019: यंदा सरकारने खूप मोठे गाजर आणले; अजित पवारांनी उडवली खिल्ली
3 Budget 2019 : केंद्राने सादर केलेला अर्थसंकल्प लोककल्याणकारी-मुख्यमंत्री 
Just Now!
X