दिवसागणिक वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पुण्यामधील एका कार्यक्रम ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, तुम्हाला जनतेनं निवडून दिलं आहे. झालेल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत, जेणेकरुन त्यातून नागरिकांना मदत मिळेल. पेट्रोलची किंमत १०० रुपयांपेक्षा पुढे जाईल असं म्हटलं जात होतं. प्रत्येक्षात काही राज्यात पेट्रोलनं शंभरी ओलांडली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य आणि मध्यम वर्गीय त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ही दरवाढ कमी झाली पाहिजे, ही माझीच नाही तर सर्वांचीच भावना आहे. तसेच नेहमीच पेट्रोलवरील राज्याचा टॅक्स किती आहे? त्यावर चर्चा असते. त्याबद्दल मी बजेट मांडताना नक्कीच सांगेल. तसेच हा टॅक्स कुठे वाढवणार आणि कुठे कमी करणार हेही निश्चितच सांगेल.
आणखी वाचा- पूजा चव्हाण प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
राज्य सरकार विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत करोनाचे कारण पुढे करीत आहे. असे विरोधक म्हणत आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, जर आम्ही निवडीला घाबरलो असतो. तर आम्ही राजीनामा देऊ दिला नसता. मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा दिला आहे.
आणखी वाचा- लॉकडाउन वाढवायचे अधिकार कोणाला?; अजित पवारांनी केलं स्पष्ट
हे सरकार तीन महिने चालेल, सहा महिने चालेल असे म्हणतात, सारखे तीन महिने विरोधक वाढवित आहेत. आता सरकारला सव्वा वर्ष झाले आहे. त्यामुळे आमच्या सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज पूर्ण करेल, सर्व एकोप्याने काम करीत आहे, असेही पवार म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2021 3:22 pm