अजित पवारांना पाठविलेल्या प्रश्नावलीला समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल. लाचलुचपत विभागाची एक कार्यपद्धती आहे त्यात अजित पवारांनाही चौकशीसाठी हजर व्हावे लागेल, असे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी महाबळेश्वर येथे पत्रकारांना सांगितले.
राज्यातील सिंचन घोटाळ्याप्रकरणातील दोषींना सोडणार नाही. लाचलुचपत विभाग सिंचन घोटाळ्याची चौकशी करत असून त्या अंतर्गत अजित पवार यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 5:35 am
Web Title: ajit pawar irrigation scam