वांद्रे येथील विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव शिवसेना नेत्यांकडून आला तर राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक प्रतिसाद देईल, असे पक्षाचे नेते अजित पवार यांनी शनिवारी तासगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. तासगाव येथील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
पवार म्हणाले की तासगावमध्ये शिवसेना, काँग्रेस, भाजपा, मनसे आदींनी उमेदवार देण्याचे टाळून बिनविरोध निवडणूक करावी असे राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. याच पद्धतीने मुंबईतील वांद्रे मतदार संघासाठी बिनविरोध निवडणुकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव दिला तर, राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याची पक्षाची तयारी आहे.