01 March 2021

News Flash

कर्नाटक सीमा भागातील शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत…. – अजित पवार

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत; सीमालढ्यातील हुतात्म्यांना केले आहे अभिवादन

संग्रहीत

“बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठी भाषक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचे मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धाराने लढत राहणे, हीच सीमा लढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमालढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले.

“१९५६ मध्ये आजच्याच दिवशी, बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालीन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरु आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीने लढतील” असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

तसेच, कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा निर्धारही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर, १८ जानेवारी १९५६ रोजी मुंबईत गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे दहा सुपुत्र शहीद, तर अडीचशेहून अधिक जण जखमी झाले होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या त्या महाराष्ट्रवीरांना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. तसेच, आंदोलनात जखमी झालेल्या सैनिक व त्यांच्या कुटुंबियांबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 2:54 pm

Web Title: ajit pawar remember the martyrs of the maharashtra and karnataka border war and greeted them msr 87
Next Stories
1 हा ढोंगीपणा नाही तर काय आहे?; काँग्रेसनं शिवसेनेवर ताणला ‘बाण’
2 आम्हाला मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय, ‘आपल्यासाठी संभाजीनगरच’ -संजय राऊत
3 बांगलादेशला जे जमले ते भारताला का नाही?; बच्च कडू यांचा मोदी सरकारला सवाल
Just Now!
X