News Flash

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; अजित पवारांनी सांगलीत केली घोषणा

अजित पवारांनी सांगलीच्या पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर ही घोषणा केली आहे.

Ajit-Pawar
"राज्य सरकार कमी पडणार नाही, केंद्राने आपली जबाबदारी पार पाडावी"

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. महापूर, भूस्खलनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. संसारच्या संसार उध्वस्त झाले. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सध्या आपत्तीग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. राज्यातली जनताही आपापल्या परीने आपत्तीग्रस्तांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदार-खासदार आता पूरग्रस्तांना मदत करणार आहेत.

सांगलीतल्या पूरग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. त्यानंतर ते बोलत होते. त्यावेळी पवार यांनी घोषणा केली की राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदार,मंत्री आपलं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देणार आहेत.

हेही वाचा-“राज्य सरकार कमी पडणार नाही, केंद्राने आपली जबाबदारी पार पाडावी”

सध्याच्या संकटात राज्य सरकार, केंद्र सरकार मदत करत आहे, राष्ट्रवादीचे सर्व आमदार,खासदार, मंत्री यांचं एक महिन्याचं मानधन देणार आहेत. महाराष्ट्रातील जनता नैसर्गिक संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करत असते. जनतेने फूल ना फुलांची पाकळी म्हणून मदत करावी. सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर जे संकट कोसळलं आहे त्यामध्ये जनतेने फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी,असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

सध्याच्या नैसर्गिक आपत्तीचा फटका सात जिल्ह्यांना बसला आहे. यात सातारा ,सांगली,कोल्हापूर पुणे जिल्ह्याचा थोडा बाधित झाला आहे. मी सगळी माहिती घेतली आहे. दोन दिवसात या संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. शिराळा ,वाळवा, पलूस भागात मोठे नुकसान झालं आहे. 80 बोट आपल्याकडे आहेत एनडीआरएफची दोन पथक काम करत आहेत. बऱ्याच लोकांना स्थलांतरित करावे लागलं आहे, अशी माहितीही पवार यांनी यावेळी बोलताना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2021 4:54 pm

Web Title: ajit pawar said all the leaders of rashtravadi will give one month salary to flood affected people vsk 98
Next Stories
1 तळीये गावाच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा; रायगड ट्रस्ट चार एकर जागा देणार!
2 “राज्य सरकार कमी पडणार नाही, केंद्राने आपली जबाबदारी पार पाडावी”
3 भास्कर जाधव प्रकरण : “या सोंगाड्यामुळे आमच्या १२ आमदारांचे निलंबन झाले ते कोणत्या नैतिकतेत बसते?”; भाजपा नेत्याचा सवाल
Just Now!
X