News Flash

अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल पार्थ पवारही अनभिज्ञ

पवारांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्राचे माजी उप-मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अजित पवारांचा हा राजीनामा मंजूर केला आहे. मात्र या राजीनाम्यामागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनाही पवारांच्या राजीनाम्याबद्दलचं खरं कारण माहिती नाहीये. एका वृत्तवाहिनीने संपर्क केला असता, आपल्याला याबद्दलची काही माहिती नसल्याचं पार्थ पवार यांनी सांगितलं आहे.

पवारांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रमुख नेत्यांनाही पवारांच्या राजीनाम्याबद्दल काहीही माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार शुक्रवारी शरद पवारांसोबत ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी मुंबईत येणार होते. मात्र पुणे आणि बारामतीमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानाचं पाहणी करण्यासाठी पवारांनी मतदारसंघात राहण्याचं ठरवलं.

अजित पवार यांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात पुढे आलं होतं. त्यांच्यासह ७० जणांची नावं २५ हजार कोटींच्या घोटाळ्यात समोर आली होती. ज्यामध्ये शरद पवार यांचंही नाव होतं. आज दिवसभर शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार ही बातमी चर्चेत होती. मात्र कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगत शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. अजित पवार हे त्या शिखर बँकेच्या संचालक मंडळावर होते. या घोटाळ्यामध्ये शरद पवारांचा संबंध असू शकत नाही कारण ते ना संचालक होते, ना सभासद होते असे सर्वांनीच स्पष्ट केले होते. मात्र कुणीही अजित पवार यांच्यासंदर्भात स्पष्टीकरण दिले नव्हते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 7:29 pm

Web Title: ajit pawar son parth also unaware about his resignation psd 91
Next Stories
1 फक्त विजयच…अशी आहे अजित पवारांची राजकीय कारकीर्द
2 अजित पवार यांनी दिला आमदारकीचा राजीनामा
3 नागपूर : पोलिसावर हल्ला करणारे तिघे जेरबंद
Just Now!
X