News Flash

वाढीव पाणीपुरवठयासह परभणीच्या योजना मार्गी

लोकसभा निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी शहर विकासासंदर्भात मंगळवारी बठक घेतली. लोकसभेत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतरही पवारांचे परभणीवरील प्रेम पुन्हा दिसून आले.

| May 21, 2014 01:54 am

लोकसभा निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणी शहर विकासासंदर्भात मंगळवारी बठक घेतली. लोकसभेत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतरही पवारांचे परभणीवरील प्रेम पुन्हा दिसून आले. परभणी शहराच्या विकासाबाबत पवार यांची भूमिका सकारात्मक असून, परभणी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती आíथक मदत देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी मुंबई येथे आयोजित बठकीत परभणीच्या महापौरांना दिले.
शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जागेअभावी रखडले आहे, असे सांगून महापौर प्रताप देशमुख यांनी जालना येथील पाणीयोजनेस सरकारने ज्या प्रकारे मदत केली, त्याच धर्तीवर परभणी मनपाला मदत करावी, अशी मागणी केली. त्यावर पवार यांनी उद्योग व कृषी विभागाला महापालिकेस आवश्यक जागा देण्याबाबत सूचना देऊन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी आíथक मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले. परभणी महापालिकेचे थकित सहायक अनुदानाच्या फरकाचे ४ कोटी रुपये त्वरित अदा करण्याबाबतही बठकीत आदेश देण्यात आला. शहरातील वीज तारा जमिनीखाली गाडून वीजपुरवठा करण्याचा प्रस्ताव आल्यास त्यास मान्यता देण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.
महापालिका कर्मचाऱ्यांचा मंजूर आकृतीबंध आराखडय़ानुसार अधिकारी वर्ग उपलब्ध करुन देणे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची ५ एकर जागा जलप्रक्रिया प्रकल्पासाठी देणे, रस्ता दिवाबत्ती सुधार कामासाठी विशेष निधी, घनकचरा व्यवस्थापनास निधी, विशेष रस्ता अनुदान, महापालिका प्रशासकीय इमारतीचे बांधकाम व दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत निधी देण्याबाबत आश्वासन बठकीत पवार यांनी दिले. तसेच पर्यटन विकासांतर्गत सादर केलेल्या प्रस्तावास दहा कोटी निधी देण्यात येईल, असे सांगण्यात आले.
महापौर प्रताप देशमुख यांनी गेल्या ५ मे रोजी परभणी शहराचा विकास व आवश्यक अनुदानासंबंधात पवार यांना पत्र लिहिले होते. पवार यांनी मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता मंत्रालयात संयुक्त बठक घेतली. नगर विकास राज्यमंत्री उदय सामंत, आमदार नवाब मलिक, अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, नगरविकास प्रधान सचिव श्रीकांत सिंह, सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर. डी. िशदे, न. पा. प्रशासनाचे संचालक भापकर, अतिरिक्त संचालक गिरीश उमप, उपसचिव जी. ए. लोखंडे, पर्यटन विभागाचे उपसचिव दि. वा. दळवी, अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव व्यंकटेश भट, परभणीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी झावरे, अधीक्षक अभियंता सुरेश गणेशकर, उपमहापौर सज्जूलाला, मनपा आयुक्त अभय महाजन, उपायुक्त दीपक पुजारी, शहर अभियंता रमेश वाघमारे आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 1:54 am

Web Title: ajit pawar special meeting
Next Stories
1 काँग्रेसच्या १२ जि. प. गटात अशोक चव्हाण यांची पिछाडी
2 नाथ्रामध्ये मुंडेच पुढे, पुतण्याचा दावा फोल!
3 गोजमगुंडे नव्या पिढीचे दमदार लेखक- िशदे
Just Now!
X