“भामा आसखेडमधून पाणी उचलण्यासाठी राज्य सरकारने २६० कोटी मागितले आहेत. पालिकेने या प्रकल्पासाठी खूप खर्च केला आहे. त्यामुळे हे २६० कोटी रुपये घेतले जाणार नाही यासाठी मी मंत्री मंडळात प्रयत्न करेन. तसेच, २३ गावे घेताना हजारो कोटी रुपयांचा निधी मागितला जातोय. आपल्या सगळ्यांनाचा माहिती आहे की करोना परिस्थितीमुळे राज्याची आर्थिक स्थिती खराब आहोत. पण तरीदेखील शक्य तेवढी मदत केली जाईल”, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणेकरांना दिलं. ते भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेचा ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या नाही तर…- देवेंद्र फडणवीस

“१९९१ मध्ये पुण्याला ५ टीएमसी पाणी लागायचे. लोकसंख्या वाढली त्यामुळे आता १८ टीएमसी पाणी लागतं. पुण्याची जेवठी गरज आहे तेवढं पाणी आम्ही देतोय. आम्ही उपकार करत नाही. परंतु यामुळे पुढे शेतीला पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे भामा आसखेड योजना पुढे आणावी लागली. पुण्याच्या भौगोलिक जलसंपदा विभागाची लोकं भेटली. भामा आसखेड योजना सुरू झाली की खडकवासालाचे २ टीएमसी पाणी शेतीला दिल्यास एक आवर्तन होईल. ग्रामपंचायत निवडणुका झाल्या की बैठक घेऊन यातून मार्ग काढू”, असंही ते म्हणाले.

सुशांत मृत्यू प्रकरण- CBI तपासाबाबत मुंबई पोलीस आयुक्तांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले…

“राज्यात सरप्लस वीज आहे. त्यामुळे टाटाने मुळशी धरणातून होणारी वीजनिर्मिती कमी करून पुणे, पिंपरी चिंचवडला पाणी द्यावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. धरणातून स्वच्छ पाणी घेत असताना इतर भागातील जनतेला दूषित पाणी देणार नाही याची खबरदारी अधिकाऱ्यांनीच घ्यायची आहे. तसेच नदीसुधारच्या कामातही सगळ्यांनी एकत्रित यावं”, असं आवाहन त्यांनी केलं.