04 March 2021

News Flash

दादा, पुढचे कार्यक्रम उशीरा ठेवा म्हणणाऱ्या आव्हाडांना अजित पवारांचे शाब्दिक चिमटे

अजित पवार यांच्या कामाचा उरक आणि आवाका मोठा आहे. त्यामुळे यापुढचे कार्यक्रम ११ नंतर घ्या अशी विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे

अजित पवार यांच्या कामाचा उरक आणि आवाका मोठा आहे. त्यामुळे यापुढचे कार्यक्रम ११ नंतर घ्या अशी विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली खरी. मात्र अजित पवारांनी त्यांना शाब्दिक चिमटे काढत सकाळी लवकर उठायची सवय करुन घ्या असं प्रत्युत्तर दिलं. हे सगळं घडलं ते पुण्यातल्या कार्यक्रमात. आव्हाड म्हणाले, “राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊन तीन महिनेच झाले आहेत. विविध मंत्र्यांकडून अनेक निर्णय घेतले जात आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये अजित पवार आघाडीवर आहेत. सकाळपासून ते रात्रीपर्यंत दादांच्या बैठका सुरु आहेत. आम्ही सगळे त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊनच काम करत आहोत. मात्र त्यांनी सकाळी दहाऐवजी अकराला कार्यक्रम ठेवावेत” असंही आव्हाड यांनी म्हटलं

यानंतर अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना शाब्दिक चिमटे काढले. “सकाळी लवकर उठायची सवय ठेवा. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मी सात वाजता गेलो होतो. त्यावेळी अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. लवकर उठून काम करावं लागतं. मी हे सगळं शरद पवार यांच्याकडून शिकलो आहे. ” असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला. तसंच अजित पवार यांनी उत्तर दिल्यानंतरही लोक हसू लागले.

आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 3:00 pm

Web Title: ajit pawar tonts jinetndra awhad in his speech scj 81 svk 88
Next Stories
1 चांगलं काम न केल्यास साइड पोस्टिंग; अजित पवारांनी भरला अधिका-यांना दम
2 पुण्यात ‘राजगर्जना’ नाही, पोलिसांनी बाईक रॅलीसाठी नाकारली परवानगी; कार्यकर्ते ताब्यात
3 उंदरांच्या जनुकांच्या अभ्यासाद्वारे गुंतागुंतीच्या रोगांवर औषधांचा शोध
Just Now!
X