लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : अकोला ते अकोट दरम्यानच्या ब्रॉडग्रेज मार्गाची चाचणी २३ जुलै घेण्यात आली. उद्यााही या मार्गावर चाचणी घेण्यात येणार आहे.
अकोला ते अकोटपर्यंतचा ४५ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे मीटरगेजवरून ब्रॉडगेजमध्ये परिवर्तनाचे काम पूर्ण झाले आहे. अकोट ते खंडवा मार्गाचे गेज परिवर्तन मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुद्द्यावरून रखडलेले असताना आता दक्षिण-मध्य रेल्वेने अकोला ते अकोटपर्यंतचा मार्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकोला स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगचे काम पूर्ण करण्यात आले. आता अकोला ते अकोटपर्यंतच्या मार्गाची विशेष गाडी चालवून चाचणी घेण्यात आली. आज सकाळी ९ वाजता अकोला रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक पाचवरून १५ डबे असलेली रेल्वे रवाना झाली. एकूण ९ ट्रॉलीपैकी चार ट्रॉली रेल्वेनंतर रवाना झाल्यात. तत्पूर्वी, फलाट क्रमांक सहावर पूजा करण्यात आली. अकोला ते गांधी स्मारक, गांधी स्मारक ते पाटसूल, पाटसूल ते अकोट व परत अकोलापर्यंत अशा टप्प्यांमध्ये ही चाचणी घेण्यात आली. उद्याा, २४ जुलैला वेगाने गाडी नेऊन चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 23, 2020 9:23 pm