लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. अकोला जिल्ह्याचा निकाल ९५.५२ टक्के निकाल लागला. गत वर्षी अकोल्याचा ७०.८२ टक्के निकाल लागला होता. यावर्षीचा निकाल तब्बल २४.७ टक्क्यांनी वाढला आहे. दरवर्षीप्रमाणे जिल्ह्याात मुलींनीच बाजी मारली.

अकोला जिल्ह्याातील २७ हजार ०९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी २६ हजार ९३३ विद्याार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यातील एकूण ९५.५२ टक्के म्हणजेच २५ हजार ७२७ विद्याार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील १३ हजार ३३४ मुले तर, १२ हजार ३९३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ९३.९९ टक्के मुले तर, ९७.२३ टक्के मुलींचा समावेश आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मुली वरचढ ठरल्या आहेत. जिल्ह्यात पातूर तालुक्याचा सर्वाधिक ९७.१७ टक्के, तर तेल्हारा तालुक्याचा सर्वात कमी ९३.६५ टक्के निकाल लागला. अकोट ९४.८६, बार्शिटाकळी ९६.१३, बाळापूर ९४.६८ व मूर्तिजापूर तालुक्याचा ९६.८५ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातील आठ हजार ९३८ विद्याार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील अनेका शाळांचा १०० टक्के निकाल लागला.