01 April 2020

News Flash

अकोल्यात मोसमातील सर्वाधिक तापमान @ ४६.३

राज्यात १७ ते २१ मे या कालावधीमध्ये उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता

राज्यात १७ ते २१ मे या कालावधीमध्ये उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

उन्हाच्या चटक्याने संपूर्ण राज्यातील लोक हैराण असताना मंगळवारी विदर्भातील अकोल्यामध्ये मोसमातील महाराष्ट्रातील सर्वाधिक कमाल ४६.३ डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. संपूर्ण विदर्भातच मंगळवारी पारा चढाच होता. वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती सर्वच ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. राजस्थानमधील बारमेरमध्येही पारा कमाल ४७.५ डिग्री सेल्सियसवर जाऊन पोहोचला होता.
कमाल तापमान
अकोला – ४६.३
वर्धा – ४६
नागपूर – ४५.९
चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती – ४४.४
राज्यात १७ ते २१ मे या कालावधीमध्ये उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. आधीच उन्हाच्या काहिलीमुळे नागरिकांचे हाल होत असताना उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2016 7:04 pm

Web Title: akola records highest temperature of the season at 46 3c
टॅग Summer
Next Stories
1 कोर्टमार्शल झालेले अधिकारी लष्करात नको – न्या. सिक्री
2 गुंतवणूकदारांचा ‘डब्बा गुल’
3 क्रीडांगणांचा खेळ खंडोबा
Just Now!
X