23 September 2020

News Flash

सामूहिक विवाह सोहळ्यात अभिनेता अक्षय कुमारकडून ७९ जोडप्यांना ७९ लाखांची भेट

प्रत्येक जोडप्याला १ लाखाचा अहेर देत अक्षयने जिंकली उपस्थितांची मनं, मुख्यमंंत्र्यांकडूनही अक्षय कुमारचं कौतुक

संग्रहित छायाचित्र

बीड जिल्ह्यात पार पडलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याला अभिनेता अक्षय कुमार यांनी हजेरी लावली होती. अक्षय कुमार यांनी सामुदायिक विवाहात सहभागी झालेल्या ७९ जोडप्यांना प्रत्येकी १ लाखाची भेट दिली. तसेच हा अत्यंत चांगला उपक्रम पंकजा मुंडे यांनी सुरु केला आहे. हा वर्षातून एकदा नाही तर दोनदा घ्यावा असंही आवाहन अक्षय कुमारने केलं. अभिनेता अक्षय कुमार याची या सामुदायिक विवाह सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हा उपक्रम आयोजित केला होता. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अक्षय कुमारने १ कोटींची मदत जाहीर केली आहे.

पंकजा मुंडे यांना मी फोन करतो तेव्हा त्या कामात असतात. त्या कायम समाजासाठी झटत असतात. यावेळी काही वाक्यं मराठीत बोलून अक्षय कुमारने उपस्थितांची मनं जिंकली. मात्र मराठी बोलत असतानाच जेव्हा तोंडी अँड हा इंग्रजी शब्द आला तेव्हा त्यांनी हिंदीत बोलण्यास सुरुवात केली.

या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी त्यांच्या भाषणात पंकजा मुंडे यांनी राबवलेल्या उपक्रमाचं कौतुक केलं. तसंच गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. तसेच अक्षय कुमारचंही त्यांनी कौतुक केलं. अक्षय कुमार एक उत्तम अभिनेताच नाही तर एक चांगला माणूसही आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अक्षय कुमार यांनी ज्या सामूहिक विवाहातील जोडप्यांना एक लाखाची भेट दिली आहे त्यांना सगळ्यांना एक संदेशही दिला आहे. जे एक लाख रुपये मी देतो आहे त्याची बायकोच्या नावाने एफडी करायची आणि त्यात भर घालत रहायची असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर अक्षय कुमारचा हात ज्याला लागतो त्याचं सोनंच होतं. एक लाखाची एफडी कराल तर त्याचे दहा लाख रुपये होतील विश्वास ठेवा असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 8:18 pm

Web Title: akshay kumar gifted 1 lakh rupees each to 79 couples in bed group marriage ceremony
Next Stories
1 मायकल जॅक्सन माहितीपट : HBO वाहिनीवर १०० मिलियन डॉलरचा दावा
2 स्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण
3 Total Dhamaal Movie Review : म्हणावी तितकी ‘धमाल’ नाही !
Just Now!
X