26 October 2020

News Flash

टाळेबंदीत पोलीसांच्या गाडीतच ओली पार्टी; पोलिसासह तिघावर गुन्हा

संबंधित पोलीस कर्मचा-यासह चौघाजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संग्रहित छायाचित्र

करोना संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी लागू केली असताना सार्वजनिक ठिकाणी गस्त घालणाऱ्या एका पोलीस गाडीत बसून ओली पार्टी करण्याचा प्रकार सोलापुरात उजेडात आला आहे. विशेष म्हणजे या ओल्या पार्टीचे थेट प्रसारण करण्यापर्यंत मजल गेल्याचेही आढळून आले. संबंधित पोलीस कर्मचा-यासह चौघाजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित पोलीस कर्मचा-याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

विनोद सूर्यकांत दंतकाळे (नेमणूक मोटार वाहन विभाग,सोलापूर पोलीस आयुक्तालय) असे याप्रकरणी कारवाई झालेल्या पोलिसाचे नाव आहे. त्याच्यासह केतन कसबे, राहुल शिंदे व सुमेध वाघमारे या त्याच्या मित्रांविरूध्द जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यासंदर्भात शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अक्कलकोट रस्त्यावरील गोपाळनगरानजीक विटभट्टीजवळ रात्री गस्त घालत आलेल्या पोलिसांची शासकीय बोलेरे गाडी थांबवून त्या गाडीत ओली पार्टी करण्यात आली. बिअर रिचवत आणि बिर्याणीवर ताव मारत ही पार्टी होत असताना त्याचे समाज माध्यमातून थेट प्रसारण करण्यापर्यंत धाडस दाखविले गेले. टाळेबंदी असताना पोलिसांच्या वाहनातच ओल्या पार्टीचा हा धक्कादायक प्रकार उघड होताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्याची गंभीर दखल घेत संबंधित पोलीस कर्मचारी विनोद दंतकाळे यास तडकाफडकी निलंबित केले. त्याच्यासह इतरांविरूध्द गुन्हाही दाखल करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 11:55 pm

Web Title: alchole party in police car in lockdown at solapur abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 निजामुद्दीनहून महाराष्ट्रात आलेल्या ५० ते ६० लोकांचे फोन बंद, पोलिसांकडून शोध सुरु
2 जितेंद्र आव्हाडांविरोधात फेसबुक पोस्ट; अभियंत्याला बेदम मारहाण
3 करोनाची लढाई जिंकण्यासाठी तीन मीटरचे सुरक्षित अंतर ठेवा-राजेश टोपे
Just Now!
X