18 February 2020

News Flash

दारू पिऊन त्रास देणाऱ्या बापाचा मुलांकडून खून;आईलाही पोलीस कोठडी

अटकेतील दोघा मायलेकांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सोलापूर : दारू पिऊन आपल्या आईला सतत त्रास देणाऱ्या पित्याचा पोटच्या मुलांनीच कुऱ्हाड आणि विळ्याने गळा कापून खून केला आणि मृतदेह भीमा नदीच्या पात्रात टाकल्याचा प्रकार उजेडात आला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी आईसह दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यापैकी एक मुलगा अल्पवयीन आहे. अटकेतील दोघा मायलेकांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

दत्तात्रेय सिध्दाराम चौगुले असे मृताचे नाव असून तो दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील राहणारा होता. त्याची पत्नी सुनीता, मुलगा आतिश व अल्पवयीन मुलगा हे तिघेही घटना घडल्यापासून बेपत्ता होते. मागील गुरुवारी भंडारकवठे येथे भीमा नदीच्या पात्रात अज्ञात पुरूषाचा मृतदेह खून केल्याच्या अवस्थेत सापडला होता. मंद्रूप पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप धांडे यांनी या गुन्ह्य़ाची नोंद करून तपास हाती घेतला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पुढील तपासाला गती मिळाली. तपासासाठी पोलिसांची चार पथके तयार करून सांगोला, सांगली तसेच शेजारच्या कर्नाटकातील चडचण भागातही पाठविण्यात आली होती.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार संशयित गुन्हेगारांची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा माग काढत मंद्रूप पोलीस चडचण भागात पोहोचले. तेथील कर्नाटक पोलिसांच्या मदतीने तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. हे संशयित मृत दत्तात्रेय याची पत्नी सुनीता व मुलगा आतिश आणि दुसरा अल्पवयीन मुलगा हेच असल्याचे आढळून आले. हे तिघे जण चडचण भागात पळून गेले होते. संशयित आरोपी सुनीता हिने दिलेल्या माहितीनुसार मृत दत्तात्रेय यास दारूचे व्यसन होते. सतत दारू पिऊन तो घरात मला मारहाण करूण असह्य़ त्रास देत असे. त्याच्या त्रासाला कंटाळून सुनीता हिच्यासह दोन्ही मुलांनी  कुऱ्हाड व विळ्याने प्रहार केला. यात तो मरण पावला. नंतर मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आणून टाकल्याचे निष्पन्न झाले.

First Published on January 16, 2020 1:47 am

Web Title: alcohol drink father son murder mother police custody akp 94
Next Stories
1 परवान्याशिवाय उत्पादन
2 तारपा वाद्याचा सूर, बिहू नृत्याची झलक
3 अडीच लाखांच्या गुटख्यासह आरोपी ताब्यात
Just Now!
X