निवडणुकीच्या काळात जिल्हाभर दारूचा पूर वाहू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी एकाच दिवशी ४ ठिकाणी छापे टाकून ४० हजार ४३० रुपयांची दारू, तसेच रोख ६ हजार ३०० रुपये आणि दोन मोटारसायकली जप्त केल्या. या वेळी पाचजणांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्रेत्यांवर छापासत्र सुरू केले आहे. पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, अतिरिक्त अधीक्षक नियती ठाकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पथकांनी मंगळवारी ४ ठिकाणी छापे टाकले. पालमजवळ फळा रस्त्यावरील महाराष्ट्र ढाब्यावर ४ हजार १५० रुपयांची देशी-विदेशी दारू, रोख २ हजार १०० रुपये व दुचाकी असा ४६ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जावेद खान मुस्तफा खान पठाण (पालम) यास अटक करण्यात आली. िपपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत िपपळदरी येथे सुरेश गंगाधर चव्हाण याच्या ताब्यातून १४ हजार ४०० रुपयांची विदेशी दारू, ५० हजार किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. चव्हाणविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली.
पालम तालुक्यातील चाटोरी येथे बाबू माणिक महािलगे याच्याकडून १९ हजार ८० रुपयांची दारू ताब्यात घेण्यात आली. त्यालाही अटक केली. गंगाखेड शहरातील नवा मोंढा येथे तिरुपती हॉटेलच्या बाजूस असलेल्या शटरमध्ये बाळू रामा आडे (गोदावरी तांडा), उत्तम कोंडीबा मुंडे (बडवणी) या दोघांकडून २ हजार ८०० रुपयांची दारू व रोख ४ हजार २०० रुपये जप्त करण्यात आले.