News Flash

बल्लारपुरात दारूविक्रेत्यांचा पोलिस पथकावर हल्ला

यात सहायक पोलिस उपनिरीक्षक लता वाढीवे व दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले.

बल्लारपुरातील शांतीनगरातील बालाजी वार्डात एका दारू विक्रेत्याच्या घरावर पोलिस पथकाने छापा मारल्यावर या दारूविक्रेत्यांनी पोलिस पथकावरच हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. यात सहायक पोलिस उपनिरीक्षक लता वाढीवे किरकोळ जखमी झाल्या. दरम्यान,
या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. बल्लारपुरातील बालाजी वार्डातील एका घरातून अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारावर पोलिसांनी या घरावर छापा मारला असता तेथे १७५ बाटल्या, १७ हजार ५०० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली.
पोलिस कारवाई सुरू असतांनाच आरोपी सुलताना परवेज शेख, सोनू परवेज शेख, हिना पठान, लखन परवेज शेख यांनी पोलिस पथकावर हल्ला केला.
यात सहायक पोलिस उपनिरीक्षक लता वाढीवे व दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत.
याप्रकरणी आरोपींविरुध्द बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 12:04 am

Web Title: alcohol sellers in ballarpur attack police squad
Next Stories
1 जळगाव महापालिका सभेत ‘खाविआ’ आणि भाजप सदस्यात खडाजंगी
2 चिपळूणमधील काँग्रेस नेते संदीप सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश, राणेंना धक्का
3 ‘डेगवे मायनिंग प्रकल्पाबाबतची भूमिका जाहीर करावी’
Just Now!
X