अलिबाग पोलिसांचा अभिनव उपक्रम

प्रगत व गतीमान महाराष्ट्र उपक्रमा आंतर्गत अलिबाग पोलीस ठाण्यात अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली अर्थात व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वयित करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात येणारया अभ्यागतांच्या माहितीचे संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून संकलन व्हावे आणि दैनंदिन कामकाजात सुसूत्रता यावी हा या उपक्रमा मागचा मुळ उद्देश आहे.

जिल्ह्यात पहिल्यांदाच पोलीस ठाण्यात अशा अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीची सुरवात करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन मध्ये येणारया प्रत्येक व्यक्तीला सन्मानजनक वागणूक मिळावी, त्यांच्या तक्रारीचे निराकरण व्हावे, दैनंदिन कामकाजात सुसूत्रता यावी, प्रशासकीय गतिमानता वाढावी हा या उपक्रमा मागचा मुळ उद्देश आहे.

पोलीस ठाण्यात येणाऱ्या व्यक्तीना कर्मचाऱ्यांकडून योग्य वागणूक दिली जात नाही, तक्रार नोंदवून घेतली जात नाही अशा तक्रारी नेहमीच ऐकायला मिळतात. यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस स्टेशन परिसरात सिसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र तरीही तक्रारीचे प्रमाण कमी झालेले नाही. हिबाब लक्षात घेऊन रायगड पोलीसांनी अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरवातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाण्यात हि योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे.

दैनंदीन कामासाठी दररोज पोलीस ठाण्यात अनेक जण येत असतात, आरोपी, फिर्यादी, तक्रारदार, अर्जदार विवीध अशा व्यक्तींचा समावेष असतो. येणाऱ्या व्यक्तींची कुठेतरी नोंद असणे, त्यांच्या तक्रारीचे समाधान झाले कि तपासणे क्रमप्राप्त होते. पोलीस स्टेशनच्या कामात सुसूत्रता यावी आणि येणारया जाणाऱ्या व्यक्तीची नोंद रहावी यासाठी या अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीची सुरवात करण्यात आली आहे. यासाठी अलिबाग पोलीसांनी एक सॉफ्टवेअर बनवून घेतले आहे.

या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून येणारया जाणारया अभ्यागतांची माहिती संकलीत केली जाते आहे. येणारया व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ओळखपत्र क्रमांक, त्याच्या कामाचे स्वरुप, येण्याची वेळ, जाण्याची वेळ, कामाचे निराकरण झाले अथवा नाही यासारख्या नोंदी या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून संकलित केल्या जात आहे. सदर व्यक्ती किती वेळा पोलीस स्टेशनला आली. आणि याचे संकलनही ठेवणे शक्य होणार आहे. विनाकारण पोलीस ठाण्यात येणारया व्यक्तीना प्रतिबंध घालणेही यामुळे शक्य होणार आहे. यासाठी एक स्वतंत्र पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणार आहे.

सुरवातीला अलिबाग पोलीस ठाण्यात प्रायोगिक तत्वावर हि संगणकीय अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वयित करण्यात आली आहे. या प्रणालीचा पोलीस अधिक्षकांच्या माध्यमातून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. पोलीस स्टेशनच्या आवश्यकतेनुसार त्यात आवश्यक ते बदल केले जात आहेत. एकदा हि यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वयित झाली की ती टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यामंध्ये कार्यान्वयित केली जाणार आहे.

पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद रहावी, त्याच्या कामाचे जलद निराकरण व्हावे, आणि दैनंदिन कामकाजात सुसूत्रता यावी हा या अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचा उद्देश आहे.  प्रगत व गतीमान महाराष्ट्र संकल्पनेतून अलिबाग पोलीस ठाण्यात हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन प्रशासन व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही संगणकीय प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.     – सुरेश वऱ्हाडे, पोलीस निरीक्षक