खालापुर  तालुक्यातील आसरे येथील व्यसनमुक्ती केंद्रात १९ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. आरबाझ आसिफ खान असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी खालापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी श्रीकांत सुरेंद्र खंडागळे या २१ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

मुंबईतील अंधेरी येथे राहणाऱ्या आरबाझवर आसरे येथील व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान व्यसनमुक्ती केंद्रातील मुंबईतील बांद्य््रााच्या श्रीकांत यांच्याशी मस्करी केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. राग अनावर झाल्याने व्यसनमुक्ती केंद्रातील उपचार घेणाऱ्या रात्री श्रीकांत याने आपल्या हाफ चड्डीची नाडी काढून अरबाझ याचा गळा आवळला, यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खालापुर पोलीस ठाण्यात  दाखल करण्यात आला असून आरोपी श्रीकांत याला अटक करण्यात आली आहे.