जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात वाढत असताना, आज कोल्हापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे.  करोना संशयित रुग्णांच्या बाबत आजचा दिवस कोल्हापूरकरांना दिलासा देणारा ठरत आहे. आज सकाळी एकूण २६ रिपोर्ट मिरज येथून प्राप्त झाले. सुदैवाने हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोनाच्या बाबतीत दररोज परस्थिती बदलत आहे. एखादा दिवस दिलासादायक असतो तर दुसरा दिवस धक्का देणारा असतो, असे चित्र आहे. तीन दिवसांपूर्वी करोनामुक्त झालेले भाऊ-बहीण घरी परतले होते. तर, त्याच्या दुसऱ्या दिवशी इचलकरंजी येथील आजोबा व नातवास करोनाची लागण झाल्याचे वृत्त होते.

आणखी वाचा- महाराष्ट्रात करोनाबाधित मृतांची संख्या ३०० च्या पुढे, रुग्णसंख्या ६८१७ वर पोहोचली

काल प्राप्त झालेले सर्व अहवाल निगेटिव्ह होते. आज सुद्धा प्राप्त झालेले सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे कोल्हापुरात करोनाची परिस्थिती गंभीर असली तरी नियंत्रणाखाली असल्याचे दिसत आहे. सुदैवाने अद्याप एकही रुग्ण कोल्हापुरात दगावलेला नाही.