पंढरपूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी मानाच्या पालख्या पंढरीला विसावल्या आहेत.पंढरपूर जवळील वाखरी येथे सर्व पालख्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्व पालख्या आप आपल्या मठात मुक्कामी राहणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे देखील पंढरपुरात पोहचले आहेत.

राज्य सरकारने परवानगी दिलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत सोपानदेव, संत मुक्ताई आणि संत एकनाथ महाराज यांच्या पालख्या मंगळवारी पंढरीकडे एस टी बसमधून प्रस्थान ठेवले. या वेळी ठिकाणी भाविकांनी पुष्पवृष्टी केली. तसेच दर्शन घेतले. सायंकाळी सातच्या सुमारास एक एक पालखी वाखरी येथील पालखी तळावर आले.

यावेळी पंढरपूर पालिकेचे नगराध्यक्ष साधना भोसले यांनी सर्व पालख्यांचे स्वागत केले.त्यानंतर सर्व महाराजांच्या पालखी आपल्या मठात मुक्कामी पोहचल्या. या ठिकाणी फुले आणि रांगोळीच्या पायघड्या घालून सर्वात केले.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपुरात दाखल झाले आहेत. एकंदरीत आषाढी एकादशी सोहळ्यासाठी संतांच्या पालख्या आणि मुख्यमंत्री पंढरीत दाखल झाले आहे.