11 August 2020

News Flash

वसई-विरार पालिकेच्या रुग्णालयातील ‘ते’ सर्व आरोग्य कर्मचारी करोनामुक्त

शहरातील एकूण करोनाबाधीतांची संख्या १५२ वर पोहचली

(प्रतिकात्म छायाचित्र)

वसई विरार महापालिकेच्या सर डीएम पेटीट रुग्णालयातील करोनाबाधीत झालेले सहाच्या सहा वैद्यकीय कर्मचारी करोनामुक्त झाले आहे. रविवारी ३ परिचारिका आणि एका वॉर्डबॉयला घरी सोडण्यात आले. तर दुसरीकडे शहरात रविवारी दोन नवे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या १५२ एवढी झाली आहे.

वसई विरार महापालिकेच्या सर डीएम पेटीट रुग्णालयातील ६ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. त्यात ५ परिचारिकांचा समावेश होता. मागील आठवड्यात दोन परिचारिका करोनामुक्त झाल्या होता. तर आज उर्वरित ३ परिचारिका आणि १ वॉर्ड बॉय करोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. यामुळे पालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान रविवारी नालासोपारा शहरात आणखी २ रुग्ण आढळले आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या १५२ झाली आहे. त्यातील ६५ जण करोनामुक्त झाले असून ७७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2020 9:38 pm

Web Title: all the health workers of vasai virar municipal hospital are corona free msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 सृजनक्काचा मृत्यू नक्षल चळवळीसाठी धक्कादायक
2 सामान्य माणूस रस्त्यावर येईल आणि उद्रेक होईल; माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा इशारा
3 चंद्रपूर : उत्तर प्रदेशातील 307 मजुरांना जिल्हा प्रशासनाने केले रवाना..
Just Now!
X