News Flash

राज्यातील आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे

 अकोल्यातील रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा वेग चिंताजनक

राजेश टोपे (संग्रहित)

लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येत आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. करोना संसर्ग पसरण्यात अकोला जिल्ह्याची परिस्थिती अधिक बिकट असून रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा वेग चिंताजनक आहे. त्यावर अत्याधुनिक साधनांचा वापर करून नियंत्रण मिळवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

अकोला जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारी आयोजित बैठकीत घेतला. यावेळी अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘राज्यात कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत करोना परिस्थितीवर चर्चा झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील मानकांपेक्षा अधिक बिकट परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये अकोल्याचा समावेश आहे. त्यामुळे अडचणी जाणून घेण्यासाठी आलो. जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा दर जरा जास्त आहे. मृत्यूदर नियंत्रणात येत असला तरी राज्याचा तीन टक्के असून, अकोला जिल्ह्यात साडेपाच टक्क्यांवर आहे. रुग्ण दुप्पटीचे प्रमाण लक्षात घेतल्यास महाराष्ट्रात साडेसतरा दिवसांत, तर अकोल्यात १३ दिवसांतच होत आहे.’

शहरातून सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. करोना नियंत्रणासाठी जनजागृतीची गरज असून, त्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिकेने सर्वेक्षण अधिक प्रभावी व परिणामकारक केले पाहिजे. सोबतच त्यांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. त्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत, असे टोपे म्हणाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व स्त्री रुग्णालयातील परिचारिकांसह वर्ग चारचे रिक्त पदे भरण्याचे निर्देश उपसंचालकांना दिले आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची चिंता राहणार नाही. आतापर्यंत समोर आलेले करोनाबाधित रुग्ण हे सव्र्हेमधून निदर्शनास आले आहेत. त्यामुळे याला समूह संक्रमण म्हणता येणार नाही. हे सर्व रुग्ण मुंबई, दिल्ली येथून आले असून काही रुग्ण संपर्कातील आहेत, असे त्यांनी सांगितले. राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांचा अनुशेष आहे. ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

विलगीकरण कक्ष व प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील विलगीकरण कक्षाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी रुग्णांशी चर्चा करून सुविधा मिळतात की नाही याची सविस्तर माहिती घेतली. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातही त्यांनी पाहणी केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता डॉ.सुधीर ढोणे व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 9:04 pm

Web Title: all vacancies in the state health department will be filled says rajesh tope scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सातारा : पोलीस ठाण्यातच तक्रारदार, आरोपीत हाणामारी; एकाची धारदार शस्त्राने हत्या
2 सोलापुरात कोसळल्या धर्माच्या भिंती; कुलकर्णी काकूंवर मुस्लिम समुदायाने केले अंत्यसंस्कार
3 महाबळेश्वर, पाचगणीतील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू
Just Now!
X