News Flash

स्वारगेट पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू ?

त्या तरुणाचा स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाल्याची घटना

सांगली जिल्ह्यातील अनिकेत कोथळे याचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूच्या घटनेची राज्यभरात चर्चा सुरू असताना पुण्यातील स्वारगेट पोलिसांनी मोबाइल चोरी प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतले होते.  त्या तरुणाचा स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकानी केला आहे.

अजित कल्लप्पा पुजारी (वय 22) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्या तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कोथरुडमधून अजित पुजारी याला चोरी प्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते. मोबाइल चोरी प्रकरणी त्याच्याकडे चौकशी करताना त्याच्या पोटामध्ये अचानक दुखू लागले. त्यामुळे त्याला तात्काळ ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले असून हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अजित पुजारीच्या मृत्यूची माहिती कुटूंबियांना समजताच ससून रुग्णालयात एकच गर्दी केली असून पोलिसांच्या मारहाणीतच अजितचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नेमका कशामुळे मृत्यू झाला आहे हे आता शवविच्छदेन अहवालानंतरच समजू शकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2018 7:47 pm

Web Title: allegation from relatives on pune police that youngster died in police custody
Next Stories
1 पुणे: देशात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणातून कन्येचा जन्म
2 लग्न जुळत नसल्याने नैराश्यातून बहीण भावाची आत्महत्या
3 सुसूत्रीकरण योजनेची रखडपट्टी
Just Now!
X