गणेशोत्सव काही अटी शर्थींवर साजरा करण्यासाठी ठाकरे सरकारने संमती दिली आहे. त्याच धर्तीवर बकरी ईद साजरी करण्यासाठीही संमती दिली जावी अशी मागणी करणारं पत्र काँग्रेस नेते नसीम खान यांनी केली आहे. आगामी गणेशोत्सव महाराष्ट्रात साधेपणाने साजरा करण्यास संमती देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे बकरी ईद हा मुस्लीम बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. हा सणही साधेपणाने साजरा करण्याची संमती द्या अशी मागणी नसीम खान यांनी पत्र पाठवून केली आहे.

मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या काही नेत्यांकडून बकरी ईद साजरी करण्याची संमती द्या अशी मागणी होत होती. या मागणीला समर्थन देऊन नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
congress candidate rashmi barve caste certificate cancelled in just eight days after complaint lodge
राज्य शासनाच्या ‘गतिमान कारभारा’चे दर्शन! तक्रारीनंतर अवघ्या आठ दिवसांत रश्मी बर्वे यांची जात वैधता रद्द

आता या मागणीवर सकारात्मक विचार करुन बकरी ईद साजरी करायला संमती मिळते का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. “राज्यात वेगवेगळे सण साधेपणाने साजरे करायला ठाकरे सरकारने संमती दिली आहे. मग बकरी ईदला का नाही? गणेशोत्सवाला जसे निर्बंध लावून सण साजरा करण्याची संमती दिली आहे त्याच पद्धतीने बकरी ईद साजरी करण्याचीही संमती द्या. १ ऑगस्ट रोजी मुस्लीम समाजाचा अतिशय महत्त्वाचा सण असलेल्या ईद ऊल अदाहच्या दिवशी म्हणजेच बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याची सूट आणि तशी व्यवस्था सरकारने करुन द्यावी. याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा” असं नसीम खान यांनी म्हटलं आहे.