News Flash

सचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाल्या…

ट्विट करत राज्यातील करोना परिस्थितीवरही केलं भाष्य

अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

अंबानींच्या घराजवळ स्फोटकं सापडली. या खळबळजनक घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. त्यानंतर एनआयएने तपास सुरू करत सचिन वाझे यांना अटक केली. या अटकेनंतर ठाकरे सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहेत. विरोधी पक्षनेते नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडून कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपाबरोबरच उद्योगपतींना धमकावण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला आहे. “एकीकडे नागपूरसारख्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्णांना भरती करण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार कोविड सेंटरमधून भ्रष्टाचार करत आहे आणि उद्योगपतींना भीती दाखवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजना आपल्याच काही हस्तकांसोबत बनवत आहे,” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- घटनाक्रम! स्कॉर्पिओ, मनसुख हिरेन मृतदेह ते सचिन वाझेंना अटक; कोणत्या दिवशी काय घडलं?

आणखी वाचा- विनंती! देवेंद्र फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; ‘सीडीआर’वरून काँग्रेसने दिला सल्ला

दुसरीकडे वाझे प्रकरणावरून भाजपानं पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. “चौकशी होऊ द्या मगच वाझेंवर कारवाई करू अशीच तुमची भूमिका होती. अचानक वर्षा या तुमच्या अधिकृत निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत गृहमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत काय खलबंत सुरू झाली आहेत, मुख्यमंत्री साहेब?,” असं म्हणत भाजपाने सध्या सुरू असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या बैठकांबद्दल सवाल उपस्थित केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 1:16 pm

Web Title: ambani bomb scare case sachin vaze case amruta fadnavis tweet criticised uddhav thackeray bmh 90
Next Stories
1 “त्या मर्सिडीजसोबत भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो, भाजपाचे नेते याचा खुलासा करतील का?”
2 विनंती! देवेंद्र फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; ‘सीडीआर’वरून काँग्रेसने दिला सल्ला
3 ज्वारीपेक्षा चिंचोके महाग
Just Now!
X