कोरेगाव भीमा हिंसाचाराशी हिंदुत्त्ववादी संघटना किंवा आंबेडकरी जनतेचा संबंध नाही. कोरेगाव भीमा या ठिकाणी हिंसाचार घडण्यापूर्वी पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ ला एल्गार परिषदेचा कार्यक्रम झाला होता. कबीर कला मंच, रिपब्लिकन पँथर यासह माओवादी विचारांच्या संघटनांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सत्यशोधन समितीचे माजी खासदार प्रदीप राऊत आणि कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी केली. यावेळी त्यांनी सत्यशोधन समितीचा अहवालही मांडला.

एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार हे दोघे माओवाद्यांच्या संपर्कात असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे. कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे असे स्मिता गायकवाड आणि प्रदीप रावत यांनी म्हटले आहे. एल्गार परिषदेच्या दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करणारे संदेशाचे फलक लावण्यात आले होते. त्याच दरम्यान पोलिसांनी योग्य कारवाई केली असती तर हा हिंसाचार उसळला नसता असेही राऊत आणि गायकवाड यांनी म्हटले आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणी विश्वास नांगरे पाटील ग्रामीण अधीक्षक सुएझ हक यांच्यासह अधिकाऱ्यांनी गृहखाते आणि मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली आहे या सर्वांची चौकशी केली जावी आणि त्यांची चौकशी केली जावी अशीही मागणी करण्यात आली.

१ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमाला हिंसाचार उसळला होता. त्या हिंसाचारात एकाचा बळीही गेला होता. या हिंसाचाराचे पडसाद राज्यभरात उमटले होते.