26 November 2020

News Flash

आंबेनळी घाटात दरड कोसळली, अनेक पर्यटक घाटात अडकले

दरड कोसळल्याने महाबळेश्वर- पोलादपूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूरमध्ये मोठी कारवाई केली आहे. नागपूर येथील डीआरडीओच्या यूनिटमधून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटला अटक केली आहे.

सातारा येथील आंबेनळी घाटात दरड कोसळली असून यामुळे घाटात अनेक पर्यटक अडकले आहेत. दरड हटवण्याचे काम सुरू असून वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही तास लागतील, असे सांगितले जाते. दरड कोसळल्याने महाबळेश्वर- पोलादपूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सातारा येथील आंबेनळी घाटात सकाळी आठच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली. वाहतूक ठप्प झाल्याने अनेक पर्यटक घाटात अडकले आहेत. दरड हटवण्याचे काम सुरू असून तुर्तास दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे. मात्र, चार चाकी गाड्यांची वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही तास लागतील, असे सांगितले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 10:21 am

Web Title: ambenali ghat closed after landslide poladpur mahabaleshwar traffic tourist stranded
Next Stories
1 पेट्रोल-डिझेलला सोन्याचा भाव, नाशिकमध्ये 80 लीटर डिझेल चोरीला
2 जिल्हा बँकांची मक्तेदारी मोडीत
3 सरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना
Just Now!
X