सांगली : सांगलीतील कृष्णातीरी असलेल्या अमरधाम स्मशानभूमीनजीक एका झाडावर ‘स्कारलेट मकाव’चे (अमेरिकन पोपट) रविवारी दर्शन झाले. त्याच्या दर्शनाची ही वार्ता पसरताच हा आगळा वेगळा पोपट पाहण्यासाठी संचारबंदी असतानाही नागरिकांनी मोठी गर्दी केली. अखेर ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य छडीमार करावा लागला.

अमरधाम स्मशानभूमीजवळील एका झाडावर मकाव पोपटाचे आगमन झाल्याची बातमी पसरताच अनेक नागरिक त्याला पाहण्यासाठी या ठिकाणी जमा झाले. नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी तात्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. या पोपटाला पकडण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागालाही पाचारण करण्यात आले. मात्र अंतिम क्षणी या पोपटाने हवेत झेप घेऊन पोबारा केला. यानंतर सेमवारी सकाळी या पक्ष्याचे कवठेपिरान येथे दर्शन झाले.

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब
siddhu moosewala house video goes viral after his brother birth
वयाच्या ५८ व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म; घरातील जल्लोषाचा VIDEO व्हायरल

शहरातील प्राणिमित्र मुस्तफा मुजावर आणि कौस्तुभ पोळ यांनी सांगितले,की हा पक्षी अमेरिकेतील असून भारतामध्ये काही शौकिन याचे पालन करतात. या पक्षाची  लांबी ३० ते ३९ इंचापर्यंत असते. वजनदार पक्षी असल्याने त्याला फार काळ हवेत भरारी मारता येत नाही. तरीही एकावेळी तो १० किलोमीटरचे अंतर पार करू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात या पाळीव पक्ष्यासाठी २ ते ३ लाख रुपये मोजावे लागतात.