News Flash

“त्या यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करावा”; अमोल कोल्हेंची ठाकरे सरकारकडे मागणी

यासंदर्भातील नाराजी कोल्हे यांनी ट्विटवरुन व्यक्त केली आहे

अमोल कोल्हे (फाइल फोटो)

छत्रपती संभाजी महाराजांच्या ३५९ व्या जयंती १४ मे रोजी (तारखेप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील ठाकरे सरकारकडे एक मागणी केली आहे. छत्रपती संभाजी महारांचे नाव थोर महापुरुषांची दिनविशेष यादीत नसल्याबद्दल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटवरुन त्यांनी यासंदर्भात आपली नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर राज्य सरकाने यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.

कोल्हे यांनी मंगळवारी ट्विटवरुन छत्रपती संभाजी महाराजांच्या नवाचा उल्लेख राज्य सरकारच्या महापुरुषांशीसंबंधित दिनविशेष यादीत नसल्याचे निर्दर्शनास आणून दिले. “महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही,” असं कोल्हे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या औपाचरिक ट्विटर हॅण्डलला टॅग करत, “विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी,” असंही म्हटलं आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत कोल्हे यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 8:14 am

Web Title: amol kolhe demands to include chatrapati sambhaji maharaj name in government list scsg 91
Next Stories
1 पक्षातील स्पर्धक कमी व्हावा म्हणून मला वारंवार छळलं गेलं -एकनाथ खडसे
2 भाजपात लोकशाही पद्धत राहिलेली नाही; राज्यातील नेतृत्वावर एकनाथ खडसे संतापले
3 “१०५चे पन्नास व्हायला उशीर लागणार नाही; सामाजिक समीकरणात पंकजा मुंडे, बावनकुळे बसत नव्हते का?”
Just Now!
X