28 October 2020

News Flash

“तुमच्या प्रार्थनांमुळे मी बचावले,” खासदार नवनीत राणा आयसीयूमधून बाहेर

नवनीत राणा यांनी शेअर केला व्हिडीओ

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं. त्यापूर्वी त्यांच्यावर नागपूरमधील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, नवनीत राणा यांनी आज यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि आपल्या प्रकृतीत सुधारणा होत असून आयसीयूमधून आता सामान्य कक्षात आणण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी दिली.

नवनीत राणा यांच्यावर यापूर्वी नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु त्या ठिकाणी त्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना मुंबईत नेऊन त्यांच्यावर उपचार सुरु केले गेले पाहिजेत असा सल्ला नागपूरमधील डॉक्टरांनी दिला होता. त्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने मुंबईला आणण्यात आणण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खासदार नवनीत राणांना ६ ऑगस्टला करोनाची बाधा झाली.

आणखी वाचा- राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील करोनाबाधित

दरम्यान, आज त्यांनी फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. “आज मला आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये आणण्यात आलं. आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांमुळेच मी वाचले आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच. मी लवकर बरी होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत रूजू होणार आहे,” असं नवनीत राणा म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 5:18 pm

Web Title: amravati mp navneet rana coronavirus health is stable now shares facebook video admitted in leelavati hospital mumbai jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे जाणते राजे गप्प का ॽ विखेंचा खोचक प्रश्न
2 कोयना धरणातून साडेदहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
3 राज्यात उत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यास सर्वोच्च प्राधान्य : मुख्यमंत्री
Just Now!
X