News Flash

“मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांचा राजीनामा घ्यावा”; कंगना वादात नवनीत राणांची उडी

राणा यांची मुख्यमंत्री, संजय राऊत यांच्यावर टीका

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. तसंच आताही दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार संजय राऊत यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. तसंच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि राऊत यांच्यावर निशाणाही साधला.

“संजय राऊत यांनी राज्याच्या ठेका घेतला आहे का? त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. ते सतत महिलांचा अपमान करत आहेत. त्यांनी आपली मर्यादा साभाळावी,” असं राणा यावेळी म्हणाल्या. “कुठे ना कुठे मुख्यमंत्र्यांचं राऊतांना समर्थन आहे असं वाटत आहे. जर मुख्यमंत्र्यांचं राऊत यांना समर्थन असेल तर मुख्यमंत्री बाहेर येऊन त्यांचं समर्थन करतील आणि जर त्यांचा राऊत यांना विरोध असेल तर त्यांनी राऊत यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा घ्यावा,” असं त्या म्हणाल्या.

अनेक वेळा राऊत यांनी राजकीय व्यक्तींवर किंवा अराजकीय व्यक्तींवर आपल्या वृत्तपत्रातून टीका केली आहे. त्यांच्यावर त्यावरून कधीही कारवाई झाली नाही. तर करोनाच्या काळात कोणाच्याही कार्यालयावर त्वरित कारवाई करण्याची आवश्यकता काय होती?. जर महाराष्ट्राच्या जनतेसाठी काही करायची इच्छा असेल तर मुख्यमंत्र्यांनी मातोश्री सोडून बाहेर पडावं. भंडारा-गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला. तेथे मुख्यमंत्री गेले नाही. तरूणांची परिस्थिती, शेतकऱ्यांची गोरगरीबांच्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेणं आवश्यक असल्याचंही त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 2:15 pm

Web Title: amravati mp navneet rana criticize cm uddhav thackeray mp sanjay raut should take resignation kangana ranaut bmc office jud 87
Next Stories
1 “आधी राष्ट्रवादीनं ऐकवलं आणि काँग्रेसही ऐकवणार, शिवसेनेला कळण्यापूर्वीच…;” राम कदमांचा टोला
2 “वडिलांच्या चांगल्या कर्मामुळे तुम्हाला संपत्ती मिळेल पण…” कंगनाचा उद्धव ठाकरेंना टोला
3 कंगनानं पालिकेच्या ‘वादात’ शरद पवारांना ओढलं; जितेंद्र आव्हाड म्हणाले…
Just Now!
X