अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आदिवासींच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “घराबाहेर पडा आणि लोक कसं जगत आहेत पहा,” असं म्हणत नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यावंर टीका केली असून आदिवासींच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. आदिवासींच्या जीवाशी होणारा खेळ थांबवला जावा अशी विनंती नवनीत राणा यांनी केली आहे.
नवनीत राणा यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये त्या बसमध्ये प्रवास करताना दिसत आहेत. यावेळी त्या सांगत आहेत की, “आज आपण जर या बसची अवस्था पाहिली तर संपर्ण महाराष्ट्रातील खराब झालेल्या बसेस आमच्या मेळघाटात पाठवून देतात. २० वर्ष जुनी बस मेळघाटातील आदिवासी, शेतकरी आणि इथे राहतात त्यांच्यासाठी पाठवतात”.
मुख्यमंत्री महोदय जागे व्हा ,मातोश्रीच्या बाहेर निघा मेळघाटातील आदिवासीच्या व्यथा-वेदना जाणून घ्या pic.twitter.com/9betpbq31M
— Navneet Kaur Rana (@NavneetKRana) October 9, 2020
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “बसची परिस्थिती पाहिलीत तर अगदी खराब आहे. आदिवसींना असंही जगणं मुश्कील आहे. मेळघाटातील सर्व एसटी चालक, कंडक्टर यांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की बाहेर पडा आणि लोक कसं जगत आहेत हे पहा. गेल्या सहा महिन्यांपासून चालक, कंडक्टर यांचे पगार झालेले नाहीत याचा विचार करा”.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 10, 2020 8:41 pm