मित्रासोबत बारमध्ये दारू पिण्यास गेलेल्या शिवसेना शहरप्रमुखाची डोळ्यात मिरचीपूड टाकून धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली. तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आशीर्वाद वाईन बारसमोर रात्री ५ जणांनी शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली आणि त्यानंतर धारदार शस्त्रांनी वार केले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख ३४ वर्षीय अमोल पाटील याची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या करण्यात आली. तिवसा शहरातून जाणाऱ्या अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आशीर्वाद वाईन बारसमोर शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अमोल पाटील मित्रासोबत शनिवारी रात्री आशीर्वाद बारमध्ये गेला होता. मात्र बार बंद झाल्याने दोघंही बारसमोर बसले होते. यावेळी पाच जणांनी अमोल पाटीलच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याची हत्या केली. बारसमोर दारू पित असल्याची संधी साधून ५ आरोपींनी अमोल पाटील यांच्यावर हल्ला चढवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

या घटनेचं वृत्त वार्‍यासारखं शहरात पसरलं. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस निरीक्षक रिता ऊईके यांनी तातडीने तपास हाती घेत शनिवारी रात्री उशिरापर्यंत ४ आरोपींना अटक केली. तर १ आरोपी फरार आहे. संदीप रामदास ढोबाळे (वय ४२), प्रविण रामदास ढोबाळे, प्रविण उर्फ अविनाश एकनाथ पांडे (वय ३०) आणि रुपेश घागरे (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण तिवसा शहरातील रहिवाशी आहेत.

हेही वाचा- पुण्यात चार पोलिसांविरोधात गुन्हा; महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण

ही हत्या अवैध धंद्यातून झाली असल्याची चर्चा आहे. अमोल पाटील याच्यावर याआधी दोन हत्या केल्याचा आरोप होता. त्याला या प्रकरणांमध्ये अटकही करण्यात आली होती. कट रचून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हत्या करण्यापूर्वी अविनाश पांडे यांनी आशीर्वाद बारमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मयत अमोल पाटील याला दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपाराचा आदेश देखील काढला होता.