News Flash

अमरावती येथे शाळेची भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, तीन जखमी

भातकुली तालुक्यातील आष्टी येथे मणिबाई छगनलाल देसाई विद्यालय असून या विद्यालयाची भिंत दुपारी एकच्या सुमारास कोसळली

प्रतिकात्मक छायाचित्र

अमरावतीमधील भातकुली तालुक्यात शाळेची भिंत कोसळल्याची घटना घडली असून यात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. भातकुली तालुक्यातील आष्टी गावात ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.

भातकुली तालुक्यातील आष्टी येथे मणिबाई छगनलाल देसाई विद्यालय असून या विद्यालयाची भिंत दुपारी एकच्या सुमारास कोसळली. यात वैभव गावंडे (वय १३) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तो इयत्ता आठवीत शिकत होता. मणिबाई देसाई विद्यालयाची इमारत जुनी असल्याचे सांगितले जाते. जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने आष्टी येथे तणावाचे वातावरण पसरले आहे. आष्टी येथे आजूबाजूच्या गावांमधून अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. जखमी विद्यार्थ्यांपैकी दोघे जण देवरी आणि अनकवाडी येथील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 2:54 pm

Web Title: amravati school building wall collapse in bhatkuli ashti village one student dead 3 injured
Next Stories
1 मोदी सरकार बळीराजाशी बेईमान-शरद पवार
2 VIDEO: लहानपणी शाळेत न जाण्यासाठी उद्धव ठाकरे ही शक्कल लढवायचे
3 शिर्डीजवळ ट्रकला कारची धडक, दोन ठार; ४ जखमी
Just Now!
X