अमरावती : मूळचे अमरावतीकर आणि सध्या स्कॉटलंड येथे वैद्यकीय सेवा देत असलेले डॉ. संदेश प्रकाश गुल्हाने यांनी नुकतीच स्कॉटिश संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली. स्कॉटिश संसदेत निवडून जाणारे संदेश गुल्हाने हे भारतीय वंशाचे पहिलेच खासदार आहेत. त्यांनी स्कॉटिश संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली. त्यांच्या यशाने अमरावतीत आनंद व्यक्त के ला जात आहे.

येथील भाजी बाजार परिसरातील प्रकाश व त्यांच्या पत्नी पुष्पा गुल्हाने यांचे चिरंजीव संदेश गुल्हाने यांचा जन्म लंडनमध्येच झाला. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या संदेश गुल्हाने यांनी पूर्व किल्ब्राईडमधील रुग्णालयात ऑर्थोपेडिक रजिस्ट्रार म्हणून काम केले आहे. वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी विविध क्षेत्रात कार्य करत स्कॉटिश राजकारणात प्रवेश केला. २०२१ मध्ये डॉ. संदेश यांनी स्कॉटलंडच्या संसद निवडणुकीत ग्लासगो पोलॉक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. स्कॉटिश कन्झव्र्हेटिव्ह आणि युनियनवादी पार्टीकडून डॉ. संदेश खासदार म्हणून निवडून आले. डॉ. संदेश गुल्हाने यांनी कोविडसाठी आघाडीवर काम केले आहे.

प्रकाश गुल्हाने यांची एक बहीण अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण  केल्यावर प्रकाश यांना अमरावतीवरून लंडनला घेऊन गेली. १९७५ साली लंडन येथे गेल्यानंतर डॉ. संदेश यांच्या वडिलांना एक खासगी नोकरी मिळाली. चांगली नोकरी मिळाल्यामुळे प्रकाश गुल्हाने यांनी लंडनमध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. डॉ. संदेश गुल्हाने यांचाही जन्म लंडनमध्येच झाला. संदेश हे लहानपणी अमरावती जिल्ह्यात आपल्या वडिलांसोबत अनेकदा यायचे. दिवाळीसारख्या सणाला ते हमखास आपल्या गावी अमरावती यायचे.    संपूर्ण महाराष्ट्रासह अमरावतीकरांसाठीही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. अमरावतीकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. डॉ. गुल्हाने यांना विविध सामाजिक कामांचीदेखील आवड आहे, अशी प्रतिक्रि या भाजपचे प्रवक्ते शिवराय कु ळकर्णी यांनी दिली.

माझे मामा प्रकाश गुल्हाने लंडन येथील एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते. ८ तारखेला डॉ. संदेश गुल्हाने स्कॉटिश संसदेत निवडून आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आमचा आनंद द्विगुणित झाला. एक सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने कुठलाही राजकीय वारसा नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर संपादन केलेले यश जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे आहे. – महेश सुरंजे, अचलपूर (संदेश गुल्हाने यांचे मामेभाऊ)