अमृता फडणवीस यांच्यासाठी आता वाद आणि ट्रोलिंग नवं राहिलेलं नाही. सोशल मीडियावर व्यक्त होताना त्या अनेकदा ट्रोल झाल्या आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्या पुन्हा एकदा ट्रोल झाल्या.
आधुनिक भारत के चाणक्य श्री @AmitShah जी को जन्मदिन की बहुत बहुत बधाइयाॅं ! #HappyBirthdayAmitShah #AmitShah #Chanakya pic.twitter.com/d0mIq9PR7j
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 22, 2020
ट्विटरवरुन अमित शाह आणि पती देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक फॅमिली फोटो शेअर करताना त्यांनी शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी फोटोला कॅप्शन देताना त्यांनी शाह यांना आधुनिक भारताचे चाणक्य असं संबोधलं. तर देवेंद्र फडणवीस यांनी शाह यांना महत्वाचे निर्णय घेणारी व्यक्ती आणि यशस्वी गृहमंत्री असं म्हटलं.
आधुनिक भारत गानसम्राज्ञी की चाणाक्य को जन्मदिन की शुभकामनाऐ.@ChitraKWagh
— Tushar kaklij (@KaklijTushar) October 22, 2020
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ६९ व्या वाढदिवशी शुभेच्छा देताना ‘राष्ट्रपिता’ संबोधलं होतं. त्यावेळी त्यांना सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.
चाणक्य दिल्ली मे है, तो पिता महाराष्ट्र मे है,,,,,,,,,
मग चंद्रगुप्त मौर्य कोण? साहेब?— Ashok B.Kothekar. (@Abkspeak121) October 22, 2020
शाह यांना आधुनिक भारताचे चाणक्य संबोधनं हे युजर्सना पटलं नाही. त्यामुळे त्यांनी अमृता फडणवीस यांना टीकात्मक प्रतिक्रियाही दिल्या. एकानं त्यांना विचारलं की, बऱ्याच काळापासून तुम्ही राज्याला तोंड दाखवलेलं नाही. राज्यात भाजपा सत्तेत येऊ न शकल्याच्या पार्श्वभूमीवर या युजरने त्यांना टोला लगावला. तर दुसऱ्या एकानं म्हटलं की, अमित शाह हे आधुनिक भारताचे चाणक्य तर तुम्ही आधुनिक भारताच्या गाणकोकिळा आहात. एकानं त्यांना विचारलं की चाणक्य दिल्लीत, पिता महाराष्ट्रात आहे तर चंद्रगुप्त मौर्य कोण आहेत? साहेब?
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 22, 2020 9:10 pm