News Flash

“अमित शाह तर आधुनिक भारताचे…”; अमृता फडणवीसांकडून वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

अमृता फडणवीसांचं ट्विट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज वाढदिवस असून राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते विरोधी पक्षातील नेत्यांपासून सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून अमित शाह यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही अमित शाह यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी अमित शाह यांचा उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आधुनिक भारताचे चाणक्य अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या असून भारताच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा देश साक्ष असल्याचं म्हटलं आहे.

याशिवाय भाजपाच्या इतर नेत्यांनीही ट्विटरच्या माध्यमातून अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान अमृता फडणवीस यांनी नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘भारताचे पितामह’ म्हटलं होतं. भारताला इतर कोणत्याही देशाचे अनुकरण करण्याची गरज नाही! भारत हा फक्त भारतच बनला पाहिजे कारण एकेकाळी भारताला ‘सोने का चिड़िया’ म्हटलं जात होतं असं पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य होतं. हे वाक्य ट्विट करत अमृता फडणवीस यांनी मोदींचा उल्लेख ‘नव्या भारताचे पितामह’ असा केला होता. “पंतप्रधान मोदींसारख्या अनुभवी नेतृत्वाला (विकासाचा) मार्ग माहिती आहे, ते मार्ग जाणतात आणि मार्ग दाखवतात! अशा दूरदर्शी नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,” असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 10:49 am

Web Title: amruta fadavis mentions home minister amit shah as chanakya while giving birthday wishes sgy 87
Next Stories
1 सीबीआयला राज्यात तपासबंदी करण्याच्या निर्णयावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…
2 VIDEO: कॅशलेस दुकानाद्वारे कष्टकऱ्यांची मदत करणाऱ्या अनघा ठोंबरे
3 शिवसेनेकडून नरेंद्र मोदींचं कौतुक; गेल्या आठ महिन्यांतील उत्तम संबोधन केल्याची पावती
Just Now!
X