विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या गाण्यांमुळे तर सोशल नेटवर्किंगवरील वक्त्यांमुळे अमृता या चर्चेत असल्याचे चित्र पहायला मिळतं. अनेकदा त्यांनी केलेल्या वक्तव्यांवरुन वाद झाल्याचंही दिसून आलं आहे. मात्र राजकारणात नसूनही अनेकदा राजकीय टोलेबाजी केल्याने त्यांच्यावर विरोधीपक्षातील नेत्यांपासून त्यांच्या समर्थकांपर्यंत अनेकजण टीका करताना दिसतात. असं असतानाही अमृता फडणवीस या त्यांचे पती म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना कोणताही राजकीय सल्ला कधी देत नाहीत. यासंदर्भात स्वत: अमृता यांनीच एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. दुसऱ्या प्रोफेशनमध्ये असणाऱ्या बायकोने पतीला सल्ला देत यामध्ये पडावं असं मला वाटतं नाही, असं अमृता म्हणाल्या आहेत.

नक्की वाचा >> गाण्यावरील ट्रोलिंगमुळे निराश व्हायला होतं का?; अमृता फडणवीस म्हणतात… 

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय वाटचालीमध्ये तुमचा वाटा कितपत आहे. म्हणजे घरुन कधी काही सांगणं होतं का की असं करायला हवं किंवा असू करु नये, अशा काही चर्चा होतात का? तुमचा या सर्वात किती वाटा असतो किंवा सहभाग असतो, असा प्रश्न अमृता यांना मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता यांनी भाजपा हा राष्ट्रीय स्तरावरील प्रोफेश्नल पक्ष असून त्यामध्ये सल्ला देणारे अनेकजण आहेत असं मत व्यक्त केलं.

नक्की वाचा >> …म्हणून मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही; अमृता यांनी सांगितली ‘मन की बात’

“भारतीय जनता पार्टी हा एक राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहे. यामध्ये बायको जी स्वत: राजकारणामध्ये नाहीय थेट ती सल्ला देत नाही. देवेंद्रजींचे दिग्गज असे वरिष्ठ नेते त्यांना सल्ला देऊ शकतात असं मला वाटतं. तसेच देवेंद्रजी स्वत: या क्षेत्रामध्ये अंत्यंत निपुण आहेत. मला वाटत नाही की एक नॅशनलाइज पार्टी जी योग्य प्रकारे प्रोफेश्नली मॅनेज आहे, त्यात बायको जीचं दुसरं प्रोफेशन आहे तीने मध्ये पडावं. तसेच माझे जे निर्णय असतात ते मी घेते. त्यात देवेंद्रजीही मला सल्ला देत नाहीत,” असं अमृता म्हणाल्या.

नक्की वाचा >> अमृता फडणवीस म्हणतात, मी योग्य मुद्दा सापडल्यावरच बोलते आणि शिवसेनावाले…

अमृताजींचे ट्विट हे त्यांचेच विचार असतात का? की त्यांना कोणी तरी सांगतं असे ट्विट करायला, अशी कुठेतरी कुजबूज केली जाते नेहमी. तरअशी कुजबुज करणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल, असा पुढचा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “तुम्हाला मी अशी महिला वाटते का जी माझ्या पतीने मला सांगावं की असं जाऊन बोलं आणि मी बोलीन? मी जन्मात तसं नाही बोलणार. जे मला वाटतं तेच मी दरवेळेस बोलते,” असं अमृता म्हणाल्या.