News Flash

“ए भाई, तू जो कोण असशील…”; अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

"लक्षात ठेव, सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही"

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील कमालीचे आक्रमक झालेत. फडणवीसांना उत्तर देताना, ‘मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती. याचं उत्तर द्यावं’, असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. त्यावरुन आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाई जगताप यांनी केलेली टीका अमृता फडणवीस यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसत असून, प्रत्युत्तर देताना अमृता यांनी जगताप यांचा एकेरी उल्लेख केलाय. “ए भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं नाही. पोलिसांची खाती राज्यात यूटीआय बँक/अ‍ॅक्सिस बँकेला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही!” अशा आशयाचं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांना इशारा दिला आहे.

काय म्हणाले होते जगताप ?
माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचं उत्तर द्यावं. फडणवीस यांनी तब्बल 21 जणांना त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत काय बोलणार? असं भाई जगताप म्हणाले होते. त्यावर आता अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2021 9:56 am

Web Title: amruta fadnavis slams bhai jagtap on mumbai police accounts transfer to axis bank sas 89
टॅग : Devendra Fadnavis
Next Stories
1 …म्हणूनच नवनीत राणा उद्धव ठाकरेंचा द्वेष करतात; अरविंद सावंतांनी आरोप फेटाळला
2 …यामुळे मी फार व्यथित झालोय; अनिल देशमुखांनी आरोपांवर केला खुलासा
3 जत तालुक्यात चालुक्यकालीन शिलालेख उजेडात
Just Now!
X