राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन एक खास फोटो ट्विट करत देवेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही मला आणि माझ्यासारख्या अनेकांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा दिली आहे, अशा शब्दांमध्ये अमृता यांनी देवेंद्र यांच्या कामाचे कौतुक केलं आहे.

नक्की वाचा >> “अशीच महाराष्ट्राची सेवा करत राहा”; फडणवीस यांना वाढदिवसाच्या ‘शाही’ शुभेच्छा

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
Sharad Pawar On PM Narendra Modi
“पेट्रोलचे दर ५० दिवसात कमी करणार असं मोदी म्हणाले होते, आता तीन हजार दिवस..”, शरद पवारांचा सवाल
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Devendra Fadnavis slams jayant patil
“जयंत पाटील नाराज…”, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे नाव घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

अमृता फडणवीस यांनी ट्विवटरवरुन देवेंद्र यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटोमध्ये दोघेही हसताना दिसत आहेत. फोटोला कॅप्शन देताना अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलला टॅग केलं आहे. “देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. निस्वार्थ सेवा, पारदर्शकता आणि कष्ट या सर्व गुणांचा समावेश असणारी ही व्यक्ती दिवसोंदिवस समाज उपयोगी आणि लोकहिताची कामं करत असून या कामासाठी त्यांनी स्वत:चे आयुष्य वाहून घेतलं आहे. तुम्ही मला आणि माझ्यासारख्या अनेकांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा दिली आहे,” अशा शब्दांमध्ये अमृता यांनी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नक्की वाचा >> कागदावरील ‘त्या’ तीन शब्दांमुळे अमृता फडणवीस झाल्या ट्रोल

देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून अमृता फडणवीसही कायमच चर्चेत असल्याचे चित्र दिसून आलं आहे. अगदी अमृता यांची गाणी असो किंवा त्यांनी केलेली राजकीय टीका असो अमृता या कायमच बातम्यांमध्ये झळकताना दिसतात. अमृता यांनी केलेल्या काही वक्तव्यांवरुन २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर सत्ता स्थापनेच्या काळात अमृता फडणवीस विरुद्ध ठाकरे कुटुंब असा शाब्दिक सामना रंगल्याचे पहायला मिळालं होतं. अमृता या सोशल नेटवर्किंगवर चांगल्याच अॅक्टीव्ह असून त्या आपली मते सोशल मिडियाच्या माध्यमातून मांडत असतात.