तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर घोटीजवळ रविवारी सकाळी झालेल्या अपघातात महिला ठार, तर मुलगा जखमी झाला.
नाशिककडून घोटीच्या दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीपैकी एका वाहनाचा एका दुचाकीला धक्का लागला. त्याच वेळी दुसऱ्या दुचाकीवरील अरुण गुळवे हे घाबरल्याने ते सोबत असलेल्या आपल्या आईसह खाली पडले. नंदा गुळवे (५०) यांच्या डोक्याला मार लागला. या अपघाताची माहिती समजताच नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी तातडीने जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु गुळवे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.