20 January 2021

News Flash

क्रिकेट खेळताना झाला वाद; डोक्यात बॅट मारल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

पेण पोलीस ठाण्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

अलिबाग : क्रिकेट खेळताना झालेल्या किरकोळ वादातून प्रेम दळवी या १३ वर्षीय मुलाच्या डोक्यात बॅट मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

क्रिकेट खेळताना झालेल्या वाद एका १३ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला आहे. खेळताना झालेल्या किरकोळ वादातून डोक्यात बॅट मारल्याने पेण शहरातील कुंभार आळी परीसरात प्रेम दळवी या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगेश रघुनाथ दळवी हे मूळचे मांगरूळ गावचे रहिवासी असून सध्या ते पेण येथील कुंभार आळीतील सद्गुरू पार्क सोसायटीत कुटुंबीयांसोबत राहतात. मंगेश दळवी यांचा मुलगा प्रेम दळवी (वय १३) हा सोसायटीतील मित्रांसोबत शनिवारी सायंकाळी सोसायटीच्या आवारातच क्रिकेट खेळत होता. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास खेळताना मुलांचा आपआपसात वाद झाला. या किरकोळ वादातून प्रेमच्या डोक्यावर तिथे खेळत असणाऱ्या दुसऱ्या एका १४ वर्षीय मुलाने बॅटची उपट मारली. ही बॅट प्रेमच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरात लागल्याने गंभीर दुखापत होऊन प्रेम जागीच खाली कोसळला. ही गोष्ट रहिवाशांना कळताच ते प्रेमला रुग्णालयात घेऊन गेले. पण पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

ही दुःखद घटना कळताच उपजिल्हा रुग्णालयाबाहेर हजारोंच्या संख्येने नागरिक जमा झाले होते. या घटनेमुळे पेण तालुक्यातील नागरिक हळहळ व्यक्त करत असून शुल्लक वादही किती विकोपाला जाऊ शकतात अशी चर्चा सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 8:51 pm

Web Title: an argument broke out while playing cricket a 13 year old boy died after being hit in the head with a bat aau 85
Next Stories
1 सुरक्षेत कपात केल्याचं स्वागत, पण…; चंद्रकांत पाटलांनी सरकारला दिला सल्ला
2 फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात; शरद पवारांनी गृहमंत्र्यांना केला फोन
3 पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी शब्दही नव्हते, केवळ हात जोडून उभा राहिलो – मुख्यमंत्री
Just Now!
X