News Flash

यवतमाळमध्ये दिवसभरात चार पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

पाच जण उपचारानंतर स्वगृही परतले

प्रतिकात्मक छायाचित्र

जिल्ह्यात आज गुरुवारी चार नवीन पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. यात तीन युवक आणि एक युवती आहे. तर पॉझिटिव्ह असलेले पाच जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या चारपैकी तीन युवक हे अनुक्रमे २८, ३३ आणि ३६ वर्षांचे आहेत. हे सर्वजण महागाव येथील मृत पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील आहेत. तर एक १५ वर्षीय बालिका नागापूर (ता. उमरखेड) येथील मृत पॉझिटिव्ह महिलेच्या निकटच्या संपर्कातील आहे. त्यामुळे जिल्ह्यात अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६ वर पोहचली होती. मात्र विलगीकरण कक्षात भरती असलेले व सुरुवातीला पॉझिटिव्ह असलेले पाच जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१ वर आली आहे.

दरम्यान, महागाव, उमरखेड या भागातून बहुतांश पॉझिटिव्ह रुग्ण येत असल्यामुळे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी आज नागापूर येथील प्रतिबंधित क्षेत्राचा दौरा करून आढावा घेतला. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लो रिस्क संपर्कातील नागापूर येथील १०० जण आणि महागाव व पुसद येथील प्रत्येकी ५० अशा एकूण २०० नागरिकांना जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी स्थानिक यंत्रणेला दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 9:22 pm

Web Title: an increase of four positive corona patients a day in yavatmal aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अकोल्यातील करोना रुग्णांची संख्या ७०० च्या वर, ४६ नवे रुग्ण
2 राज्यातील आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे
3 सातारा : पोलीस ठाण्यातच तक्रारदार, आरोपीत हाणामारी; एकाची धारदार शस्त्राने हत्या
Just Now!
X