25 February 2021

News Flash

‘करोना’शी लढाई! बाबा आमटेंचं ‘आनंदवन’ पुरवणार ४० हजार ‘फेस मास्क’

मोफत करणार वाटप...

(सांकेतिक छायाचित्र)

करोनाविरोधात लढण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची तिसरी पिढी देखील सज्ज झाली आहे. आनंदवन या बाबा आमटेंच्या कुष्ठरोग्यांसाठी असलेल्या संस्थेकडून आता कापडाची थ्री लेयर मास्क निर्मिती सुरू झाली आहे. करोनाच्या संसर्गापासून रक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक कापडाच्या मास्कसह, संपूर्ण चेहरा झाकण्यासाठीचे फेस शील्ड आता बाबा आमटेंची महारोगी सेवा समिती संस्था तयार करणार आहे. विशेष म्हणजे हे मास्क आनंदवनमधील मूकबधिर, कुष्ठरोगी, मानसिक रुग्ण असे दिव्यांग व्यक्ती तयार करत असून हे पूर्णपणे मोफत संस्थेकडून दिले जात आहेत.

“सरकारकडून आनंदवनकडे 40,000 मास्कची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी 3600 मास्क बनवून तयार आहेत, तर 1390 मास्क वाटण्यातही आले आहेत. याशिवाय मास्कच्या निर्जुंतिकीकरणासाठी देखील दोन खास पाऊच बनवले जात आहेत. संस्थेच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी आणि आनंदवन या दोन प्रकल्पांमध्ये प्रतिबंधात्मक सुरक्षा साधनांची निर्मिती केली जात आहे”, असे आनंदवनच्या डॉ. शीतल आमटे यांनी सांगितले. तर, “रुग्णालयातील बाह्य़ रुग्ण विभागात तपासणी करणाऱ्या डॉक्टरांकडे कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांकडे पीपीईसह अन्य काही गोष्टींची मागणी आम्ही केली आहे. परंतु तोपर्यत उपलब्ध बाबींचा वापर करत सुरक्षा साधने तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत”, असे लोकबिरादरी प्रकल्पाच्या डॉ.अनघा आमटे यांनी सांगितले.

मास्क कसे?
किमान संसर्ग रोखू शकेल असे जाड आणि श्वास घेण्यासही सोयीस्कर असेल अशा फॅब्रिकचा वापर मास्क बनविण्यासाठी केला आहे. हे फॅब्रिक आनंदवनमधील पॉवरलूममध्ये काढलेले आहे. विशेष म्हणजे हे मास्क आनंदवनमधील मूकबधिर, कुष्ठरोगी, मानसिक रुग्ण असे दिव्यांग व्यक्ती तयार करत असून हे पूर्णपणे मोफत संस्थेकडून दिले जात आहेत.

मास्क ठेवण्यासाठी पाकीटही..
मास्क वापरल्यानंतर तो बॅगेत किंवा असाच ठेवला तर त्यातून संसर्ग पसरण्याचा संभव असल्याने वापरलेले आणि न वापरलेले (निर्जतुक) मास्क ठेवण्यासाठी दोन स्वंतत्र कापडी पाकिटेही तयार केली आहेत. एका व्यक्तीने किमान सहा मास्क घेणे गरजेचे आहे. दर चार तासांनी मास्क बदलणे, घरीच प्रेशर कुकरच्या मदतीने मास्कचे निर्जतुकीकरण कसे करावे, याचीही माहिती दिली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 1:15 pm

Web Title: anandwan baba amtes family lends a hand in covid 19 fight producing 40 thousand masks sas 89
Next Stories
1 औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातल्या परिचारकाला करोनाची लागण
2 तबलिगी जमातने माफीनामा जाहीर करावा, मुस्लीम सत्यशोधक मंडळाची मागणी
3 Respect Mr. CM! काश्मीरपासून दक्षिणात्य राज्यांपर्यंत… देशभरातून होतंय उद्धव यांचं कौतुक
Just Now!
X